महाराष्ट्रीयन दागिणे कोडे
दागिने ओळखा.
1 लाकडापासून बनलेला दागिना
2 फक्त बायको साठीचा दागिना -
3 आंबट गळ्यातले-
4 एक शहर दागिना
5 ह्या फुलांचा हार
6 श्री हरीचा दागिना
7 पायातले गळ्यात ?-
8 एकनाथांचा दागिना-
9 एक धान्याचा हार
10 नाष्ट्याचा दागिना
11 ही पाण्या ऐवजी पायात काय करते-
12 हा विणायचा की घालायचा
13 हिच्या मालकीचे घर असते
14 उभयतांना चालणारा ऐतिहासिक दागिना
15 साताऱ्याला गायब झाली-
16 हिंदी लडकी
17 डावी आणि उजवी. दोन्हीकडे बंदी-
18 बिंदिया गोस्वामी
19 खुशी शब्दाशी यमक जुळणारा
20. एक अंक +एक खायचा पदार्थ-
उत्तरं:
1. तुळशी मण्यांची माळ
2. मंगळसूत्र
3. चिंचपेटी / तनमनी
4. कोल्हापुरी साज
5. बकुळ हार
6. मोहन माळ
7. चपला हार
8. कुंडल
9. जोंधळी हार/पोत
10. पोहे हार
11. मासोळी
12. गोफ
13. चाव्यांचा छल्ला
14. अंगठी
15. बुगडी
16. पायल
17. वाकी / बाजूबंद
18. बिंदी
19. ठूशी
20. एक दाणी

Comments
Post a Comment