महाराष्ट्रीयन दागिणे कोडे
दागिने ओळखा. 1 लाकडापासून बनलेला दागिना 2 फक्त बायको साठीचा दागिना - 3 आंबट गळ्यातले- 4 एक शहर दागिना 5 ह्या फुलांचा हार 6 श्री हरीचा दागिना 7 पायातले गळ्यात ?- 8 एकनाथांचा दागिना- 9 एक धान्याचा हार 10 नाष्ट्याचा दागिना 11 ही पाण्या ऐवजी पायात काय करते- 12 हा विणायचा की घालायचा 13 हिच्या मालकीचे घर असते 14 उभयतांना चालणारा ऐतिहासिक दागिना 15 साताऱ्याला गायब झाली- 16 हिंदी लडकी 17 डावी आणि उजवी. दोन्हीकडे बंदी- 18 बिंदिया गोस्वामी 19 खुशी शब्दाशी यमक जुळणारा 20. एक अंक +एक खायचा पदार्थ- उत्तरं: 1. तुळशी मण्यांची माळ 2. मंगळसूत्र 3. चिंचपेटी / तनमनी 4. कोल्हापुरी साज 5. बकुळ हार 6. मोहन माळ 7. चपला हार 8. कुंडल 9. जोंधळी हार/पोत 10. पोहे हार 11. मासोळी 12. गोफ 13. चाव्यांचा छल्ला 14. अंगठी 15. बुगडी 16. पायल 17. वाकी / बाजूबंद 18. बिंदी 19. ठूशी 20. एक दाणी